नांदेड जिल्हा प्रशासनाकडून तक्रारी, अर्ज व पत्रव्यवहारासाठी जलद, पारदर्शक व सुरक्षित डिजिटल सेवा
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार किंवा अर्ज सादर करताना आपला WhatsApp मोबाईल क्रमांक नोंदवावा. यामुळे आपल्या तक्रारीसंदर्भातील उत्तर, पत्रे, सूचना व नोटिसा थेट WhatsApp वर पाठवता येतील.
ई-टपालवाला ही सेवा नागरिकांचा वेळ व खर्च वाचवून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी बनवते.
नागरिक अर्ज सादर करतो
WhatsApp क्रमांकासह
कार्यालयीन कर्मचारी
तक्रारीवर कार्यवाही करतात
उत्तर / पत्र
थेट WhatsApp वर पाठवले जाते
नांदेड जिल्हा प्रशासन नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही, अचूक माहिती व सुरक्षित डिजिटल संवाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनी दिलेला WhatsApp क्रमांक फक्त अधिकृत पत्रव्यवहारासाठीच वापरण्यात येईल.