महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने Whatsapp चॅटबॉट प्रणालीची सुरुवात केली आहे. ही प्रणाली नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि सुलभ प्रशासनाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्वसमावेशक माहिती नागरिकांना सहज मिळावी यादृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे.
या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा*
नागरिकांना जास्तीत जास्त दोन क्लिकमध्ये आवश्यक माहिती मिळते. सोपी आणि सुटसुटीत मेनू सिस्टीममुळे कोणत्याही वयोगटातील नागरिक सहज सेवा वापरू शकतात.
चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये संपूर्ण सेवा उपलब्ध करून देतो. नागरिक स्वतःची आवडती भाषा निवडू शकतात.
चॅटबॉटद्वारे महत्त्वाच्या सूचना, योजना माहिती आणि सार्वजनिक सूचना Whatsapp द्वारे प्रसारित केल्या जातात. IEC (माहिती, शिक्षण आणि संवाद) साहित्य नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते.
चॅटबॉटद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खालील सर्व सेवांचा समावेश:
नागरिकांसाठी आवश्यक सर्व प्रमाणपत्रे, परवाने आणि सेवा माहिती.
जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क माहिती आणि कार्यक्षेत्र.
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांची माहिती आणि कार्य.
सर्व शासकीय योजनांची तपशीलवार माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.
माहितीचा अधिकार कायद्याखालील सेवा आणि अर्ज प्रक्रिया.
आपत्तीच्या वेळी काय करावे, संपर्क क्रमांक आणि मार्गदर्शक तत्त्वे.
तक्रार नोंदणी, मागोवा आणि निवारण प्रक्रियेची माहिती.
जमीन संबंधित सेवा, ७/१२ उतारे, भूमिअभिलेख आणि महसूल सेवा.
चॅटबॉटद्वारे नागरिकांच्या प्रश्नांचे कार्यक्षम निराकरण केले जाते.
तांत्रिक सहाय्य: सेवा वापरण्यात येणाऱ्या अडचणींसाठी तांत्रिक सहाय्य उपलब्ध
चॅटबॉट सर्व मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे - Android, iOS आणि इतर स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीम. कोणत्याही स्मार्टफोनवरून सेवा वापरता येतात.
सर्व आधुनिक Android संस्करणांवर कार्यक्षम
iPhone आणि iPad वर पूर्णपणे कार्यक्षम
WhatsApp उपलब्ध असलेले सर्व स्मार्टफोन
चॅटबॉट वापरण्यासाठी फक्त मोबाईल इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. 2G पासून 5G पर्यंत सर्व नेटवर्कवर कार्यक्षम.
नांदेड जिल्हा प्रशासनात प्रथमच व्हॉट्सअॅप चॅटबॉटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा डिजिटल सेवा वितरणाचा एक नवीन मॉडेल आहे ज्याद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांसाठी एकसमान सेवा उपलब्ध करून दिली जाते.
हा चॅटबॉट महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.
तांत्रिक सहाय्य: कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी ०२४६२-XXXXXX या नंबरवर संपर्क करा